निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने 21 हजार रूग्णांची नेत्रतपासणी



निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्रतपासणी शिबिरात 21 हजार 194 रूग्णांची तपासणी करण्यात आली. 18 हजार 481 रूग्णांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात असून मोतीबिंदूचे निदान झालेल्या रूग्णांवर पुणे येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. 

निलेश लंके प्रतिष्ठान तर्फे आयोजित नेत्रतपासणी शिबीर एक विशेष उपक्रम आहे ज्याचा उद्देश्य डोळ्यांचे आजार ओळखणे आणि त्यांच्या उपचारासाठी मदत करणे हा आहे. यामध्ये डोळ्यांची अत्याधुनिक यंत्रे वापरून तपासणी केली जाते आणि आवश्येनुसार रूग्णांवर मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया केली जाते. या शिबिराचा उद्देश्य लोकांना नेत्ररोगांच्या आवश्येनुसार उपचाराची जागृती करणे आणि त्यांच्या उपचारासाठी मदत करणे आहे. 

पारनेर- नगर मतदार संघामध्ये या शिबिराचे ठिकठिकाणी आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक ठिकाणी शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला. नेत्रतपासणी नंतर रूग्णांना तात्काळ चष्म्याचे मोफत वितरण करण्यात आले. शिबिरास मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता जिल्ह्यामध्ये नेत्रतपासणी शिबीर राबविण्यात येणार आहे.

या शिबिराच्या माध्यमातून गरजू, गरीब, वंचितांची सेवा करण्याचे भाग्य लाभले. मोफत नेत्रतपासणी शिबिराच्या माध्यमातून भविष्यातही अशीच रूग्ण सेवा अविरत सुरू राहणार आहे. 











 



Comments

Popular posts from this blog

एक लढवय्या नेता (कु. सुमित प्रमोद चौधरी, मंगळुरपीर)